शिक्षकाचा शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यींनींसोबत गैरप्रकार

    08-Sep-2024
Total Views |

Anwarul Hoda 
   
रांची : एका सरकारी शाळेत विद्यार्थींनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील गोड्डा येथे आढळून आली आहे. खुद्द शाळेतील सहाय्यक शिक्षक अन्वारूल होडा त्यांच्यावर या कृत्याचा आरोप आहे. मुलींच्या जबाबानुसार, अन्वारूल विद्यार्थींनीशी अश्लील बोलतो. याप्रसंगाची माहिती पालकांना कळताच शाळेत एकच उडाला होता. यामुळे आता संबंधित शिक्षकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना गोड्ड जिल्ह्यातील महागमा विश्वखानी पंचायत नजीक घडली. येथील अन्वारूल होडा हे संग्रामपूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होते. येथे शिक्षण घेणाऱ्या अनेक अल्पवयीन विद्यार्थींनींनी त्यांच्या पालकांकडे शिक्षक अन्वारूल यांच्याबाबत तक्रारी केल्या आहेत. मुलींनी त्यांच्या घरी सांगितले की, त्यांचे शिक्षक त्यांना मोबाईलवर घाणेरडे चित्र दाखवतात.
विद्यार्थींनींचे म्हणणे ऐकून त्यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. गुरूवारी अनेक पीडितेच्या आई- वडिलांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला. यावेळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाला. परिस्थिती पाहून कुटुंबियांनी चर्चा केली. अन्वारूलवर कारवाईसाठी अधिकाऱ्यांना पत्र लिहिणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यध्यापकांच्या आश्वासनानंतर संतापलेले पीडितांचे आई- वडिल परतले.
जोपर्यंत अन्वारूल होडा शाळेत राहतील तोपर्यंत ते आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवणार नाहीत, असे पालकांनी सांगितले होते. या आंदोलनात अनेकांनी संतप्त पालकांसह स्थानिकांनी सहभागी होऊन झालेल्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणावरून जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक अन्वारूल होडा यांची दुसऱ्या शाळेत बदली केली.