अलीकडे समाजातील स्नेहबंध आणि जबाबदार्यांचे शिक्षक-विद्यार्थी ना त्यांचे भावबंध अधोरेखित करणारी एक क्लिप व्हायरल होत आहे. त्यातून वृक्षारोपणासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. शिवाय शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधातील महत्त्वदेखील यातून अधोरेखित करण्यात आले आहे.
समाजात अनेक चांगल्या घटना घडत असताना, आजकाल समाजात घडणार्या वाईट गोष्टी अशा तर्हेने समोर आणल्या जातात की, जणू आपल्या देशात, आपल्या परिसरात चांगले काही घडतच नाही. दुर्दैवाने, ही सवय माथी मारली गेल्यामुळे लोकदेखील चांगल्यापेक्षा वाईटाचेच अधिक मंथन करीत असतात. त्याचे दुष्परिणाम हे कालांतराने एकूणच समाजासाठी आणि आपल्या व्यवस्थेसाठी घातक ठरत असतात. अर्थात, या वाईट गोष्टींना सक्षमपणे हाताळणारी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, आपल्या देशातील कायद्यापेक्षा आम्हालाच अधिक समजते, अशा काहीशा तोर्यात काही मंडळी लोकांच्या गळी ही वाईट प्रवृत्ती उतरवित असल्याने समाजातील चांगुलपणाचे मोठे नुकसान होते आहे. यासाठी जी प्रभावी माध्यमे वापरली जातात, त्यात सोशल मीडिया आणि विविध वाहिन्यांवरील काही आक्षेपार्ह मालिका, कार्यक्रम आणि बातम्यांचादेखील समावेश. तोच तोपणा माथी मारला की, काय होते याचा प्रत्यय आज-काल येतो. दुर्दैवाने वाईट गोष्टी सातत्याने माथी मारल्याने चर्चाही त्याचीच होते. चांगल्या गोष्टी खूप कमी केल्या जातात. जे चांगले व्हायरल होत आहे, त्याचा प्रसार हवा तितका होत नाही. तो अधिक झाला, तर नक्कीच समाजातील विचारसरणी सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींसाठी पूरक अशी निर्माण होत राहील, यात संदेह नाही. काही रिल्सदेखील उद्बोधक आणि प्रेरक तयार केल्या जात आहेत. मात्र, काही रिकामटेकडे लोक प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात आणि लोकांना संभ्रमात ठेवण्यात धन्यता मानतात. किंबहुना, त्यांनी तसा अजेंडाच ठरवून टाकला आहे.
अलीकडे समाजातील स्नेहबंध आणि जबाबदार्यांचे शिक्षक-विद्यार्थी ना त्यांचे भावबंध अधोरेखित करणारी एक क्लिप व्हायरल होत आहे. त्यातून वृक्षारोपणासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. शिवाय शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधातील महत्त्वदेखील यातून अधोरेखित करण्यात आले आहे. लोकांनी खरे तर अशा तर्हेच्या सकारात्मक गोष्टींना पसंती दिली, तर नक्कीच या देशातील बिघडलेल्या समाजाला आपण कोठे चुकत आहोत, याचे भान येईल. रिकामटेकडी टाळकीदेखील ताळ्यावर येतील आणि सुसंस्कृततेला चार चांद लागतील.
माजात अनेक चांगल्या घटना घडत असताना, आजकाल समाजात घडणार्या वाईट गोष्टी अशा तर्हेने समोर आणल्या जातात की, जणू आपल्या देशात, आपल्या परिसरात चांगले काही घडतच नाही. दुर्दैवाने, ही सवय माथी मारली गेल्यामुळे लोकदेखील चांगल्यापेक्षा वाईटाचेच अधिक मंथन करीत असतात. त्याचे दुष्परिणाम हे कालांतराने एकूणच समाजासाठी आणि आपल्या व्यवस्थेसाठी घातक ठरत असतात. अर्थात, या वाईट गोष्टींना सक्षमपणे हाताळणारी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, आपल्या देशातील कायद्यापेक्षा आम्हालाच अधिक समजते, अशा काहीशा तोर्यात काही मंडळी लोकांच्या गळी ही वाईट प्रवृत्ती उतरवित असल्याने समाजातील चांगुलपणाचे मोठे नुकसान होते आहे. यासाठी जी प्रभावी माध्यमे वापरली जातात, त्यात सोशल मीडिया आणि विविध वाहिन्यांवरील काही आक्षेपार्ह मालिका, कार्यक्रम आणि बातम्यांचादेखील समावेश. तोच तोपणा माथी मारला की, काय होते याचा प्रत्यय आज-काल येतो. दुर्दैवाने वाईट गोष्टी सातत्याने माथी मारल्याने चर्चाही त्याचीच होते. चांगल्या गोष्टी खूप कमी केल्या जातात. जे चांगले व्हायरल होत आहे, त्याचा प्रसार हवा तितका होत नाही. तो अधिक झाला, तर नक्कीच समाजातील विचारसरणी सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींसाठी पूरक अशी निर्माण होत राहील, यात संदेह नाही. काही रिल्सदेखील उद्बोधक आणि प्रेरक तयार केल्या जात आहेत. मात्र, काही रिकामटेकडे लोक प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात आणि लोकांना संभ्रमात ठेवण्यात धन्यता मानतात. किंबहुना, त्यांनी तसा अजेंडाच ठरवून टाकला आहे.
अलीकडे समाजातील स्नेहबंध आणि जबाबदार्यांचे शिक्षक-विद्यार्थी नात्यांचे भावबंध अधोरेखित करणारी एक क्लिप व्हायरल होत आहे. त्यातून वृक्षारोपणासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. शिवाय शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधातील महत्त्वदेखील यातून अधोरेखित करण्यात आले आहे. लोकांनी खरे तर अशा तर्हेच्या सकारात्मक गोष्टींना पसंती दिली, तर नक्कीच या देशातील बिघडलेल्या समाजाला आपण कोठे चुकत आहोत, याचे भान येईल. रिकामटेकडी टाळकीदेखील ताळ्यावर येतील आणि सुसंस्कृततेला चार चांद लागतील.
करामती उद्धट
शात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे आणि लोकहितकारी धोरणे राबविणारे सरकार असल्याने कितीतरी चांगल्या गोष्टी घडत आहेत. मात्र, काही रिकामटेकड्यांच्या कल्लोळात या चांगल्या गोष्टींची जाणीव त्याचे भविष्यातील मानवी जीवनावर होणारे चांगले परिणाम लुप्त झाले आहेत. खरे तर यावरच आता सर्वांनी भर देण्याची गरज आहे, ज्यामुळे पुन्हा आपल्या राज्यात आणि देशात हा प्रगतीचा आणि विकासाचा रथ अधिक डौलाने आणि वेगाने पुढे नेता येणे शक्य आहे. दि. २३ऑगस्टपर्यंतच्या आकडेकवारीनुसार देशातील गरीब वंचितांना २.९४ कोटींहून अधिक घरे देण्यात आली आहेत. मागासवर्गीयांना १.३४ कोटीहून अधिक घरे मिळाली आहेत. ही प्रक्रिया अजूनही जारी आहे. अलीकडील काळात राज्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपयुक्त प्रकल्पांसाठी निधी मंजूर झाला आहे. यात पुणे मेट्रोसाठी २९५४.५३ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा समावेश आहे. ठाण्याच्या इंटिग्रल रिंग मेट्रोसाठी १२ हजार, २०० कोटी, महिला सशक्तीकरणासाठी ‘नमो ड्रोन दीदी योजना’ तसेच अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग्रेसर करण्याच्या दृष्टीने २४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक करार करण्यात आला, यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
शिवाय, भारतीय रेल्वेच्या नुकत्याच मंजूर झालेल्या आठ रेल्वे प्रकल्पांमुळेदेखील रोजगारनिर्मिती होणार आहे. मनमाड-इंदोर रेल्वे या नव्या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांतील सहा जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे. १८ हजार, ३६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासदेखील नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसर्या चौथ्या मार्गिकेचा प्रश्नदेखील लवकरच सुटणार आहे. यासंदर्भात नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संकेत दिले आहेत. मुद्दा हाच की, लोकांची दिशाभूल करण्यासाठी बावळटसारखे नको ते राजकारण करण्याची खोड लावणार्या विरोधकांनी या राज्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यालादेखील वाईट मार्गाला लावले की काय, अशी शंका आता यायला लागली आहे. आता विरोधकांचे कार्यकर्ते राज्यासाठी या विकासाच्या चर्चा होत असताना लोकांना भलत्याच चर्चांमध्ये गुंतवून ठेवण्याचे उद्योग करू लागल्याने करामती करणारे आणि उद्धट बोलणार्यांना वेळीच ओळखण्याची संधी लोकांसाठी यानिमित्ताने चालून आली आहे.
लेखक - अतुल तांदळीकर