सनातन हाच मानवतेला पुढे नेण्याचा एकमेव मार्ग आहे : जगदीप धनखड

    27-Sep-2024
Total Views | 37

Jagdip Dhankar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jagdeep Dhankhar Sanatan)
"आपली संविधानिक मूल्ये सनातन धर्मातून निर्माण झाली आहेत. राज्यघटनेची प्रस्तावना सनातन धर्माचे सार प्रतिबिंबित करते. सनातन सर्वसमावेशक आहे; सनातन हाच मानवतेला पुढे नेण्याचा एकमेव मार्ग आहे.", असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. गुरुवारी राजस्थान येथे आयोजित हिंदू अध्यात्मिक आणि सेवा मेळा २०२४ च्या उद्घाटनपर भाषणात ते उपस्थितांशी बोलत होते.

हे वाचलंत का? : उघड्यावर नमाज अदा केल्याने गणपत विद्यापीठात मोठा वाद!

पुढे ते म्हणाले, "भारताचे विभाजन करण्यासाठी सध्या काही लोक किती प्रमाणात सक्रिय आहेत याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशा भयंकर शक्तींचा निःपात करण्याची नितांत गरज आहे. यासाठी आपण सतर्क राहून त्वरीत कार्य केले पाहिजे. देशात पद्धतशीरपणे धर्मांतर होत आहे, जे आपल्या मूल्यांच्या आणि घटनात्मक तत्त्वांच्या विरुद्ध आहे. 'शुगर कोटेड फिलॉसॉफी' विकली जात असून समाजातील दुर्बल घटकांना लक्ष्य केले जात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. हा राजकीय, संस्थात्मक आणि सुनियोजित षडयंत्राचा भाग आहे.''
अग्रलेख
जरुर वाचा
योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावरुन सेन्सॉर बोर्डाला नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?

योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावरुन सेन्सॉर बोर्डाला नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?

(Ajey: The Untold Story of a Yogi) 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या चित्रपटावरुन मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला नोटीस पाठवली आहे. सेन्सॉर बोर्डाकडून मनमानी कारभार करत या चित्रपटाला मान्यता देण्यास विलंब होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटासंदर्भात ही मोठी अपडेट समोर आली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121