वायनाड : लेबनॉन येथे झालेल्या पेजर स्फोटाचे कनेक्शन हे देशातील केरळ येथे असलेल्या मूळ निवासींसोबत जोडण्यात आले आहे. याप्रकरणात नॉर्वेस्थित रिन्सन जोस या भारतीय कुटुंबीयांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. याप्रकरणी आता केरळ पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणातील निवासीच्या कुटुंबीयांनी याबाबत आपला जबाब नोंदवला आहे. हे प्रकरण केरळातील वायनाड येथील असल्याचे प्रसारमाध्यांनी सांगितले आहेय
याप्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचा खटला केरळा येथे करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी कुटुंब पाहिले असून कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली. यावेळी याप्रकरणाचा आणि संबंधित कुटुंबाचा कोणताही एक संबंध नसल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या बातम्या किंवा माहिती येतच असते, याबाबत तपासणी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणात जोस यांच्या कुटुंबीयांनी संरक्षणाची मागणी केली नाही. रिन्सन जोस हे १० वर्षांपूर्वी रोजगारासाठी नॉर्वे येथे गेले असता ते नॉर्वेचे रहिवासी झाले, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता भाजपचे नेते संदीप वेरियार यांनी रिन्सन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. रिन्सन हे आपल्या देशाचे नागिरक आहेत. ते आपल्या देशाचे सुपुत्र आहेत. यामुळे आपण रिन्सन आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे काम केले पाहिजे.
रिन्सनच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया :
या घडलेल्या प्रकऱणात रिन्सन याची कोणतीही एक चूक नाही असे प्रतिपादन रिन्सनच्या कुटुंबीयांनी केले आहे. रिन्सन हा भारतीय आहे. त्याचे शिक्षण हे केरळ येथे झाले आहे. १० वर्षांआधी परदेशात गेला होता. सध्या तो नोकरी करत असून याआधी तो अभ्यासासाठी परदेशात गेला असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या तो नॉर्वे येथे काम करत आहे. त्याने कोणतेही गैर काम केलेले नाही अशी त्यांनी खात्री व्यक्त केली आहे. नॉर्वे येथील बनावट कंपन्यांची पोलीस चौकशी सुरू आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतीपादन केले.