द्विपक्षीय संबंध दृढ होणार; 'क्वाड' शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण चर्चा!

    22-Sep-2024
Total Views |
quad-summit-pm-modi-meets-his-counterparts


नवी दिल्ली : 
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विल्मिंग्टन येथे आयोजित 'क्वाड' शिखर परिषदेच्या आधी जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी विल्मिंग्टनमध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या क्वाड समिटच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांची भेट पंतप्रधानांनी घेतली. ऑस्ट्रेलियासोबतच्या "काळ-परीक्षित मैत्री" बद्दल मी आनंदी आहे. द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी वचनबद्धता व्यक्त केली.

पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी विस्तृत चर्चा केली असून व्यापार, सुरक्षा, अवकाश आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये आणखी गती आणायची आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या मैत्रीला भारत खूप महत्त्व देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या परिषदेमध्ये जपान, ऑस्ट्रेलियातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

पंतप्रधान म्हणाले, पंतप्रधान किशिदा यांच्याशी खूप सकारात्मक भेट झाली. पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर, संरक्षण, हरित ऊर्जा आणि इतर क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. "भारत आणि जपानमधील मजबूत संबंध जागतिक समृद्धीसाठी चांगले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे मूळ गाव विल्मिंग्टन येथे वार्षिक क्वाड शिखर परिषद आयोजित करण्यात आली, यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी अनेक नवीन उपक्रम सुरू करण्यात आले होते आणि युक्रेन आणि गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली होती.