'Joy Avenue' च्या विविध कार्यक्रमांत मुंबईकरांचा उत्साह

    22-Sep-2024
Total Views |
joy avenue mumbai city


मुंबई : 
 श्रीमद राजचंद्रजी मार्ग, रॉयल ओपेरा हाऊस येथे दर महिन्याला एक आकर्षक सामुदायिक कार्यक्रमासाठी एसआरएमडी युथविंगच्या पुढाकाराने आणि लोधा फाउंडेशन, बीएमसी, मुंबई पोलीस आणि B.E.S.T च्या सहकार्याने आयोजित ‘जॉय एवेन्यूचा’ पहिला कार्यक्रम नुकताच पार पडला. सर्व वयोगटातील शेकडो लोक सकाळी इथे जमत कला, संगीत, आरोग्य, खेळ, संस्कृती आणि करुणा यांचा आनंद घेण्यासाठी दैनंदिन धावपळापासून मुक्ती मिळवली. या Joy Avenue च्या उद्घाटन सोहळ्यात कौशल्ये, रोजगार आणि उद्योजकतेचे मंत्री मंगल प्रभात लोढा , बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते.

खेळप्रेमींसाठी इथे पिकलबॉल, स्केटबोर्डिंग, किकबॉक्सिंग, बॉक्स क्रिकेट, बोर्ड गेम इत्यादी विविध खेळ आयोजित करण्यात आले. रिद्धिमिक योग , चेअर योग, टी मेडिटेशन , बॉक्सिंग आणि कार्डियो वर्कशॉप, महिलांसाठी स्वयंरक्षण वर्कशॉप इत्यादी विविध आरोग्य उपक्रमही आयोजित करण्यात आले. मनोरंजन व्यतिरिक्त, जॉय एवेन्यूने करुणासंपन्न समुदाय निर्माण करणे, स्थानिक उपक्रमांना पाठराखणे आणि मुंबईच्या विविध संस्कृतीचे उत्सव साजरा करण्याचा उद्देश या कार्यक्रमाचा होता.
 
या कार्यक्रमात मुंबई शहराच्या विकासात अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या विस्मृतीत गेलेल्या तारकांचे आभार मानण्यासाठी पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात समाजासाठी निस्वार्थ सेवेसाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. "JOY Avenue मध्ये अत्यंत जॉय आणि रोमांचकतेने भरलेले वातावरण पाहून मी भारावून गेलो आहे. आनंद हा एक दृष्टिकोन आहे आणि 'JOY Avenue' सारखे इव्हेंट आपल्याला तो दृष्टिकोन मिळवण्यासाठी मदत करतात. आनंदी होण्याची संधी हीच वेळ आहे, आत्ता आणि आजच आहे, असे श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे उपाध्यक्ष आत्मपित नेमजी यांनी सांगितले.

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी सत्संग, क्रीडा आणि सेवेच्या माध्यमातून तरुणांना उच्च हेतूकडे नेत आहेत, जे येथेही दिसून येते. या रस्त्याचे नाव 'श्रीमद् राजचंद्रजी मार्ग' ठेवणे अत्यंत योग्य आहे, कारण त्यांच्या मार्गावर चालून आपण खरा आनंद प्राप्त करू शकतो, असे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले.