भूतबाधेच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा मौलवीचा कट

    22-Sep-2024
Total Views |

Conversion
 
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे मोहम्मद रहमानने एका हिंदू युवतीला भूतबाधेच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा कट रचला. एका हिंदू महिलेने मौलवींवर विवाह करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पीडित हिंदू महिलेने व्हिडिओ रेकॉर्ड करून पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील गुन्हा दाखल केला असून अब्दुल रहमानच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 
ही घटना गाझियाबाद येथील असून वेव सिटी पोलीस ठाणे परिसरातील आहे. याठिकाणी गुरूवारी एका हिंदू महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत सांगितले की, पती श्रीश ओझा यांची मानसिक स्थिती अनेक दिवसांपासून स्थिर नव्हती. याचाच फायदा घेत उपचाराच्या नावाने अब्दुल रहमानने त्याच्या खात्यातून पैसे उकळण्याचे काम केले होते.
 
याप्रकरणात संबंधित पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास केला. याप्रकरणात अब्दुल रहमान हा भूतबाधेच्या नावाखाली अवैध औषधांची विक्री करण्याचे काम करत असत अशी माहिती तपासातून आढळली आहे. अंधश्रद्धा पसरवण्याच्या या कामातून तो हिंदू धर्मांतरण करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतो.
 
त्यावेळी त्यांच्या पत्नीची किडनी निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून डायलिसिसचे उपचार सुरू होते. त्यांच्या पत्नीला या उपचाराचा कोणताही एक फायदा होत नसल्याने तणाव निर्माण झाला. श्रीशांचे जगणे अधिक अवघड होऊन बसले. यावेळी मौलवीने उपचार बरा करून देतो असे सांगून ५ महिन्यांमध्ये तब्बल ७ लाख रुपयांची लूट केली.
 
यावेळी मौलवीने पीडितेच्या पतीला घर विकण्यास सांगितले होते. तसेच त्यानंतर धर्मांतरण करण्यासही दबाव आणण्यात आला होता. यावेळी पीडितेने मौलवीवर नजर ठेवत व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. त्याचा वापर करत त्यांनी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्यायसंहितेंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी संबंधित पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.