गणेश मंडळावर घोषणाबाजी करणारे १६ समाजकंटक गजाआड

    22-Sep-2024
Total Views |

Ganesh Utsav 2024
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील उत्रौला बलरामपूर जिल्ह्यात सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कट्टरपंथींनी उत्रौला बाजारपेठेत गणेश मंडळावर जमावाने पॅलिस्टिनींना समर्थन देत उन्माद करत घोषणा दिल्या आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी एफआरआय दाखल केला असून सहभागी असलेल्या १६ कट्टरपंथींना अटक करण्यात आली आहे.
 
उत्रौली येथे कट्टरपंथींनी गणेश मंडळाविरोधात घोषणाबाजी केला. यावेळी बलरामपूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७०, १२६ आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर व्हिडिओ फूटेज तपासून आरोपींची ओळख पटवून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू ठेवले आहे.
 
 
 
गणेश मंडळासमोर जोरदार घोषणाबाजी करणारे जिहादी हे बलरामपूर येथील आहे. मोहम्मद झैद, मोहम्म इरफान, शाहबाद आलम, जैद खान, मोहम्मद हुसैन, आकिब अली, मोहम्मद सलमान, मोहम्मद अश्रफ, साबीर अली, गुलाम बख्तियार, मोहम्मद माजिद, कासिम अली, मेहफूर रजा, जैद अन्सारी आणि कुतुबुद्दीन अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.