‘स्त्री २’ ने मोडला ‘बाहुबली’चा रेकॉर्ड, पाचव्या आठवड्यात जात केली सर्वाधिक कमाई
21-Sep-2024
Total Views |
मुंबई : अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘स्त्री २’ हा चित्रपट देशभरात १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. अवघ्या काहीच दिवसांत या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला होता. आणि आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला देखील ‘स्त्री २’ ने मागे टाकले आहे.
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला हा सीक्वेल असून ‘स्त्री २’ ने यशस्वीरित्या चित्रपटगृहात पाचवा आठवडा पुर्ण केला आहे. गेल्या ७ दिवसांत ‘स्त्री २’ ने २४.६५ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या आकड्यांनुसार या चित्रपटाने एस.एस राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. बाहुबली २ या चित्रपटाने पाचव्या आठवड्यात येत त्या ७ दिवसांत २४.५ कोटी कमावले होते तर स्त्री २ ने ही आकडेवारी मोडित काढली आहे. जर का स्त्री २ हा केवळ हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अॅनिमल, गदर २, जवान या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
दिनेश विझन यांच्या हॉरर कॉमेडी युनिवर्समधील ‘स्त्री २’ हा चित्रपट असून ‘भेडिया’, ‘मुंज्या’ हे या युनिवर्सचे भाग असून लवकरच यात आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘वॅम्पायर्स’ हा चित्रपटही समाविष्ट होणार आहे. आणि या चित्रपटात आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत.