मुंबई : सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुन्या चित्रपटांना पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत. यात ‘रेहना है तेरे दिल मै’, ‘रॉकस्टार’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश असून राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ हा चित्रपटही या यादीत येतो. दरम्यान, लवकरच लोकप्रिय ‘रामायण’ हा अॅनिमेशनपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लहानमुलांपासून ते वृद्धापर्यंत अशी एकही व्यक्ती क्वचित असेल ज्यांनी हे अॅनिमेटेड रामायण पाहिले नसेल.
कार्टून नेटवर्कवर आजही कधी हा चित्रपट लावला गेला तरी प्रेक्षक आवर्जून तो पाहतात असा 'रामायण- द लेजेंड ऑफ प्रिन्स राम' या अॅनिमेशनपटाला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी आवाज दिला होता आणि याची निर्मिती जपानने केली होती. आता बऱ्याच वर्षांनंतर हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित केला जाणार असून या अॅनिमेशनपटाला अरुण गोविल यांनी श्रीरामांचा आवाज दिला होता तर अमरीश पूरी यांनी रावणाला आवाज दिला होता व शत्रुघ्न सिन्हा हे चित्रपटाचे कथावाचक होते.