बनावट आधारकार्ड आणि इंस्टाग्राम खाते बनवत ३० हिंदू मुलींसोबत लव्ह जिहाद
21-Sep-2024
Total Views |
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथे पोलिसांना दोन कट्टरपंथी समाजाच्या तरूणांना अटक केली आहे. त्यांनी बनावट अधारकार्डचा वापर केला होता. पोलिसांनी पाठपुरावा करत आधारकार्ड जप्त केले आहे. हे युवक बनावट आधारकार्ड आणि ओळखपत्र बनवून हिंदू मुलींना ब्लॅकमेल करत. त्यांनी एक दोन नाहीतर तब्बल ३० हिंदू मुलींशी संपर्क ठेवत त्यांच्याशी लव्ह जिहादल करण्याचा प्रयत्न केला. ही घटना १९ सप्टेंबर रोजी बरेलीतील इज्जतनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. तर २० सप्टेंबर रोजी नगर चौकातील दोन मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या कट्टरपंथी नौशाद आणि आमानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणात पोलिसांनी आठ बनावट आधारकार्ड आणि दोन मोबाईल फोन्स जप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. नौशादने हिंदू आणि मुस्लीम नावाने सहा इंस्टाग्राम खाती खोलली होती. नौशाद हिंदू मुलींची नावे लपवून अश्लील चॅट करत ब्लॅकमेल करायचा. तर दुसरा आरोपी आमान याच्याकडे हिंदू आणि मुस्लीम नावाची तीन बनावट आधारकार्ड सापडली होती.
याप्रकरणात हिंदू संघटनेशी संलग्न असलेल्या विशालने दोन्ही तरूणांना पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. मात्र त्यावेळी कोणतीही तक्रार केली नव्हती. पोलिसांना याप्रकरणाचा तपास केला असता त्यांचे अधारकार्ड बनावट असल्याने आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
एवढेच नाहीतर याप्रकरणात कट्टरपंथी युवक एक दोन नाहीतर तब्बल ३० मुलींच्या संपर्कात होते. त्याबाबत आता पोलिसांनी बनावट आधारकार्डाची माहिती काढली होती. ते म्हणाले की, नौशादने राहुल आणि सुऱेश नावाने बनावट ओळखपत्र काढली होती. त्यामुळे त्याच्याशी इतर समाजाच्या मुली संपर्कात येत होत्या. यावेळी त्याने एकूण ३० मुलींना हिंदू असल्याचे सांगत लव्ह जिहाद करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हयरल करेल असे ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम केले.