जितेंद्र सोनावणे मुंबई शहर जिल्ह्याच्या नियोजन समितीवर
20-Sep-2024
Total Views |
मुंबई, दि. १९ : (Jitendra Sonawane) भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई सचिव तथा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र कानिफनाथ सोनावणे यांची मुंबई शहर जिल्ह्याच्या नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह एकूण १२ जणांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी राज्याच्या नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.
विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त करावयाच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये मिलिंद देवरा आणि सदा सरवणकर यांचा समावेश आहे. जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये मनिषा कायंदे, श्रीराम रावराणे, गोपाल दळवी, मीना कांबळी यांची निवड करण्यात आली आहे. तर, जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या विशेष निमंत्रितांमध्ये जितेंद्र सोनावणे, दत्ता नरवणकर, सिद्धार्थ कासारे, सिद्धार्थ गमरे, शलाका साळवी आणि सतिश तिवारी यांचा समावेश आहे.