"महिला रात्री दारू प्यायला जातात", तृणमूल काँग्रेस नेत्याने ओकली गरळ

    19-Sep-2024
Total Views |

Trinamool Congress
 
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते स्वपन देबनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महिला रात्री दारू प्यायला जातात असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत साप़डले आहेत. आपल्या मुली रात्री कुठे जातात असा दावा त्यांनी केला आहे. आर जी कर वैद्यकीय प्रकरणाविरोधात प.बंगाल येथे पूर्व बंगाल येथील कालना येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी गरळ ओकली आहे.
 
रात्री ११ वाजो नाहीतर २ वाजो महिला आणि मुली रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसतात. पश्चिम बंगाल येथे आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील झालेल्या प्रकरणाने महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला गेला आहे. यावेळी  देबनाथ म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस नेत्यांनी दोघांनीही दोषींना कठोऱ शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. पण मला सांगायचे की, मी माझ्या विभागात रात्री दारू खरेदी करण्यासाठी महिला आणि मुलींना पाहिले असल्याचे वक्तव्य नेत्याने केले आहे.
 
पुढे ते म्हणाले की, हे ऐकून मी कोणत्याही हॉटेलमध्ये महिलांना दारू दिली जाते हे शोधण्यासाठी गेलो. महिलांना रात्री दारू दिली जाऊ शकत नाही, असे मी हॉटेल मालकांना सांगितले आहे, हे माझेही कर्तव्य आहे. महिलांनी रात्री हॉटेलमध्ये दारू प्यायली आणि काहीतरी गडबड झाली तर? त्यामुळे सावध राहिले पाहिजे असे ते म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याने त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला अडचणीत टाकले आहे.