पटोले, ठाकरे आणि पवारांना आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा मान्य आहे का? भाजपचा सवाल

    19-Sep-2024
Total Views |
 
MVA
 
मुंबई : नाना पटोले आणि उध्दव ठाकरे आणि शरद पवारांना आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा मान्य आहे का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. महाविकास आघाडीने आधी हे स्पष्ट करावं, आणि मग राजकरण करावं, असेही ते म्हणाले आहेत.
 
राहूल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी त्यांच्या जीभेला चटके द्यायला हवे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु केलं आहे. यावर आता केशव उपाध्येंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
 
हे वाचलंत का? -  बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मविआसोबत यावं : जयंत पाटील
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही. परंतू, आरक्षणा बद्दलची त्यांची तीव्र भावना स्वाभाविक आहे. राहुल गांधी आरक्षणच रद्द करण्याबाबत बोलत आहेत, याबद्दल एकही काँग्रेस नेत्याने साधा आक्षेप नोंदवला नाही. राहुल गांधींनी याबद्दल अजूनही माफी मागितली नाही. आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा नाना पटोले आणि उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांना मान्य आहे का? कारण यापैकी कोणीही राहुल गांधी यांच्या विधानावर साधा आक्षेपही घेतला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने आधी हे स्पष्ट करावं, आणि मग राजकरण करावं," असे ते म्हणाले.