जागावाटपासंदर्भात पुढचे तीन दिवस मविआची बैठक : संजय राऊत

    18-Sep-2024
Total Views |
 
Sanjay Raut
 
मुंबई : जागावाटपासंदर्भात पुढचे तीन दिवस महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, अशी माहिती उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच काँग्रेस पक्ष खूप व्यस्त असूनही आम्ही त्यांना चर्चेसाठी बोलवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
संजय राऊत म्हणाले की, "आज महाविकास आघाडीची बैठक होणार असून आम्ही जागावाटपासंदर्भात चर्चा करणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर लहान पक्ष या बैठकीत सहभागी होणार आहेत. आजपासून २ ते ३ दिवस जागावाटपासंदर्भात बैठकीत चर्चा करणार आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.
 
हे वाचलंत का? -  तिसऱ्या आघाडीत एमआयएमला एन्ट्री नाही! बच्चू कडूंनी सांगिलतं कारण
 
ते पुढे म्हणाले की, "आजकाल काँग्रेस पक्ष खूप व्यस्त आहे. तरीसुद्धा आम्ही आज त्यांना बैठकीसाठी बोलवलं आहे. काँग्रेसचे नेते इतके व्यस्त आहेत की, प्रत्येवेळी तारीख पे तारीख होत आहे. त्यामुळे आम्ही आज ठरवलं असून पुढचे तीन दिवस बैठक होणार आहे. मुंबईतील जागावाटपाचा विषय जवळपास संपला आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. त्यामुळे आम्हाला विभागानुसार चर्चा करावी लागेल," असेही त्यांनी सांगितले.