एनपीएस-वात्सल्य योजना लवकरच सुरू होणार; जाणून घ्या नेमकी योजना काय

    16-Sep-2024
Total Views |
nps vatsalya yojana
 

मुंबई :      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण एनपीएस-वात्सल्य योजनेचा शुभारंभ करणार आहेत. दि. १८ सप्टेंबर रोजी अर्थमंत्री सीतारामण यांनी एनपीएस-वात्सल्य योजनेच्या माध्यमातून देशभरातील पालक आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खाती उघडता येणार आहेत. तसेच, सेवानिवृत्तीच्या वेळेस बचतीत योगदान देता येणार आहे.

दरम्यान, अर्थमंत्री सीतारामण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एनपीएस-वात्सल्य योजना यावर भाष्य केले होते. त्यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन एनपीएस-वात्सल्य योजना सुरू करणार आहेत. एनपीएस-वात्सल्य योजना खास तरुणांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पालकांना मुलांकरिता खाती उघडता येणार असून सेवानिवृत्तीच्या बचतीत भर पडणार आहे.

एनपीएस योजनेच्या माध्यमातून पालकांना ५०० रुपये मासिक किंवा ६ हजार रुपये वार्षिक गुंतवून योजना सुरू करता येणार आहे. भारतीय नागरिक, एनआरआय किंवा ओसीआय असोत त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी एनपीएस-वात्सल्य योजनेत खाते उघडण्यास पात्र आहेत. चक्रवाढ व्याजासह दीर्घ गुंतवणुकीच्या कालावधीत परतावा लक्षणीयरीत्या वाढविता येणार आहे.