डोंबिवलीत चार बांगलादेशींना केली अटक! काय घडलं?

    16-Sep-2024
Total Views |

bangladeshi
 
डोंबिवली, दि. १५: प्रतिनिधी : (Bangladeshi) घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शाबीर शेख, तौफीर शेख, लकी शेख आणि रुकसाना शेख अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. 
 
यांपैकी मोहम्मद शाबीर शेख हा बांगलादेशातून भारतात येत असताना त्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली आहे. भारतात घुसखोरी केलेले हे सर्वजण विनापरवाना कल्याणनजीकच्या पिसवली परिसरात राहत होते. मोलमजुरी करून ते कुटुंबाचा निर्वाह करीत होते. मोहम्मद शेख हा मार्च महिन्यामध्ये डोंबिवलीत आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो नातेवाईकांसह पिसवली परिसरात राहत होता. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पोलिसांनी पिसवली परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शाबीर शेख याच्यासह अन्य तीन जणांना अटक केली आहे.