ओडिशातील विद्यालयाच्या वसतिगृहात गोमांस शिजवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
16-Sep-2024
Total Views |
भुवनेश्वर : ओडिशातील बहरापूर येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात गोमांस (Beef) शिजवल्याच्या आरोपावरून बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्य़ा गटाने कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली. याप्रकरणी आता हिदू संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शने दाखवत महाविद्यालयाने याविरोधात कारवाई केली आहे. हे प्रकरण ११ सप्टेंबर रोजी रात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहरापूर येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी वसतिगृहात गोमांस शिजवले. हा प्रकार ११ सप्टेंबर रोजी रात्री घडला असून या कृतीने वसतिगृहात गोमांस शिजवल्याच्या आरोपावरून संबंधित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.
गोमांस शिजवल्याने इतर विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचे तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले होते. याप्रकरणाविरोधात कठोर काऱवाईची मागणी त्यांनी केली होती. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या कुलगुरूंकडे ही तक्रार दाखल केली गेली होती. त्यानंतर सात विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. या विद्यार्थ्यांचा निषिद्ध कामांमध्ये सहभाग असल्याचे कुलगुरूंच्या नियमांचे उल्लघन केल्याचे कुलगुरूंनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
याप्रकरणात ७ पैकी ६ विद्यार्थी हे अल्पसंख्यांक असून महाविद्यालय त्यांच्याविरोधात काय दखल घेईल हे पाहणे गरजेचे आहे. दरम्यान आता गोमांस बनवणाऱ्या विद्यार्थ्य़ांवर एफआरआय दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने केली. याप्रकरणी हिंदू संघटनांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली.