मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सर्वात चांगला : अजित पवार

    16-Sep-2024
Total Views | 55
 
Ajit Pawar
 
मुंबई : मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच असून पांढरा रंग सर्वात चांगला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यंत्री अजित पवारांनी दिली आहे. मला गुलाबी कपड्यांची गरज नाही माझा पांढरा रंग कोणत्याही रंगाला फिका करतो आणि कोणत्याही रंगात मिसळतो, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केलं होतं. यावर आता अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "पांढरा रंग सगळ्यात चांगला स्वच्छ असतो. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे. मी सुद्धा आज पांढरा शुभ्र शर्ट घातला आहे," असे ते म्हणाले. तसेच गणेशोत्सवाचे दहाही दिवस चांगले गेले असून सगळीकडे भाविकांचा उत्साह बघायला मिळाला, असेही ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो... त्यानं मराठा आरक्षण पाठिंब्याचं पत्र जरांगेंना द्यावं!"
 
१५०० रुपये देण्यापेक्षा महिलांची अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करा, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "कुणाचंही सरकार असेल तरी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे, असं वाटत असतं. तसा प्रयत्न हे प्रत्येक सरकार करत असतं. आम्हीसुद्धा तो करत आहोत. पण यावेळी लाडकी बहिण योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे. महिलेला सक्षम करत असताना तिची सुरक्षासुद्धा महत्वाची आहे," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121