"हिंदू तरूणावर माझे प्रेम, माझ्या कुटुंबातील सदस्य मला जीवे मारतील", पीडितेचा व्हिडिओ व्हायरल
15-Sep-2024
Total Views |
अलीगढ : कट्टरपंथी युवतीचे उत्तर प्रदेशातील एका हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध आहे. याप्रकरणी आता कट्टरपंथी तरूणीच्या कुटुंबीयांना आपल्या मुलीचे आणि हिंदू मुलाचे प्रेमसंबंध पसंत नाही. तिच्या घरच्यांनी तिच्या प्रेमाला तीव्र विरोध केला आहे. तिला तिच्या कुटुंबीयांनी घरात कोंडून ठेवले असून तिचा खून केला जाईल असा संशय असल्याची भिती तिला आहे. याआधी पीडितेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली होती. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील आहे. याप्रकरणाची माहिती पीडितेने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील खैर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीने तिच्या प्रियकराचे नाव शौर्य वर्मा असल्याचे सांगितले. तो हिंदू असल्याचे पीडितेने सांगितले होते. पीडितेने सांगितले की तिचा हिंदू धर्मावर विश्वास असून तिला शौर्यसोबत लग्न करायचे आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांचा याला विरोध आहे. या प्रकरणाची समोर माहिती आल्यानंतर त्याने मुलीला घरात डांबून ठेवले आणि तिची हत्या होऊ शकते अशी पीडितेने भिती व्यक्त केली आहे.
ती म्हणाली की, आपल्या कुटुंबाशी तिने सर्व संबंध तोडले असून आपल्या निर्णयावर ती ठाम आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलीने तिच्या भावावर चुकीचा स्पर्श केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच तिच्या छातीवर मारल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिला आपल्याच घरात सुरक्षित वाटत नसल्याचे तिने सांगितले आहे.
एका प्रसारमाध्यमाच्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिहांनी सांगितले की, युवक आणि युवती दोघेही प्रौढ आहेत आणि त्यांना एकमेकांशी लग्न करायचे आहे. याप्रकरणात पोलीस त्यांना पूर्ण मदत करतील असे सांगितले. पुढे ते म्हणाले की, पीडितेने तिच्या कुटुंबीयांशी याप्रकरणी चर्चा केली आहे. तरीही पोलीस या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.