शिमला : हिमाचाल प्रदेशातील संजौली येथील मशिदीच्या बेकादेशीर (Illegle Masjid) बांधकामाचा वाद थांबाता थांबत नव्हता. आता याच राज्यातील कुल्लूतही आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर हिंदूंनी हनुमान चालीसाचे पठण केले. शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी या आंदोलनाच सुन्नी, पोंटा, साहिब, हमीरपूर आणि बिलासपूर येथील बेकायदेशीर मशिदीविरोधात निदर्शने दर्शवले गेले.
प्रसारमाध्यमानुसार, हिंदू संघटनांचे सदस्य शनिवारी सकाळी कुल्लू येथे रस्त्यावर उतरले आहेत. शिमल्यात निदर्शने दर्शवून हिंदू एकजूट झाला. संजौलीतील मशिदीवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्याचा हिंदू आंदोलकांचा आरोप आहे. त्यांनी संपूर्ण मशीद हटवण्यात मागणी केली. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, हिंदू संघटनेच्या लोकांनी हनुमान चालिसाचे पठण सुरू केले, मात्र अखेर कोणताही वाद न होता आंदोलन शांततेत पार पडले. भाजपचे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत पटेल उमराव यांनीही त्यांच्या एक्स हँडेलवर निदर्शन दर्शवल्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी सांगतले की, हिंदू हे केवळ शिमला नाहीतर कुल्लू, तर सुन्नी, बिलासपूर, हमीरपूर आणि पोंटा साहिब येथे अनधिकृत बांधकाम केलेल्या मशिदींविरोधात आंदोलन करत आहेत.
हिमाचल प्रदेशातील बेकायदेशीर मशिदीविरोधात आपली एकता दाखवून व्यापाऱ्यांनी या आंदोलकांच्या बाजूने आवाज उठवला. हिमाचल प्रदेश राज्याच्या अनेक भागात बाजारपेठांमध्ये ३ तास बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले गेले. याचा सर्वाधिक परिणाम हा सुन्नी शहरांमध्ये दिसून आला असून येथील बाजारपेठा पूर्णपणे बंद आहे. हिमाचल प्रदेश पोलीस आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांना शांतता राहण्याचे आवाहन केले आहे.