बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतात मासे निर्यातीवर लावले निर्बंध
13-Sep-2024
Total Views |
ढाका : बांगलादेशात आगामी दुर्गा उत्सवादरम्यान भारताला हिल्सा मासे निर्यात करता येणार नाही. सध्या बांगलादेशात शेख हसीनांचे सरकार बरखास्त होऊन काही दिवस झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर बांगलादेशात अंतरिम नवनिर्वाचित सरकार स्थापन करण्यात आले. अशातच आता बांगलादेशातील मत्स्यव्यवसाय आणि पशुधन मंत्रालयाच्या सल्लागार फरीदा अख्तर यांनी दिलेल्या एका निवेदनात देशांतर्गत बाजारपेठांसाठी पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे.
ढाका ट्रिब्यूननुसार, बांगलादेशने हिल्सा मासे निर्यात करण्याची परवानगी देऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. यावर्षी दुर्गापूजेवेळी भारतात कोणत्याही प्रकारचे मासे निर्यात केले जाणार नाहीत अशा सूचना मंत्रालयास देण्य़ात आल्या आहेत असे अख्तर म्हणाल्या. हिल्सा मासेंच्या निर्यातीने उत्पदनाचे नुकसान होईल अशी माहिती दिली. तसेच अख्तर यांनी भारतात होणारी हिल्साची अवैध तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना लागू केल्या जातील असे सांगितले होते.
दरम्यान हिल्सा माशांचे भारतातील निर्यातीवर बंदी घालण्यात आणल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांच्या सरकारच्या काळात बांगलादेशातून भारतात मासे निर्यात व्हायचे. मात्र हा निर्णय अंतरिम सरकारने मागे घेतला आहे. शेख हसीना या सध्या भारतात वास्तव्यास असल्याने बांगलादेशातील अंतरिम सरकारची भारताविरोधी भावना निर्माण झाल्याने हिल्सा मासे निर्यातीवर बंदी आणली गेल्याचे बोलले गेले आहे.