राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन

राज्यपालांकडून बाप्पाला निरोप

    12-Sep-2024
Total Views |
 
rajbhavan
 
मुंबई, दि. ११ : प्रतिनिधी : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप दिला.
 
राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे, अशी सूचना राज्यपालांनी केल्यामुळे मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले.
 
कैद्यांनी घडवली होती राजभवनातील गणरायाची मूर्ती
 
राज्यपालांच्या निवासस्थानी स्थापन करण्यात आलेली गणरायाची मूर्ती शाडूची असून ही मूर्ती नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती. विसर्जनाच्या वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.