"जरांगेंच्या विरोधात महाराष्ट्रात..."; प्रविण दरेकरांची टीका

    11-Sep-2024
Total Views |
 
Jarange & Darekar
 
मुंबई : मनोज जरांगेंच्या विरोधात महाराष्ट्रात एक नकारात्मक लाट निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. अहंकारातून बाहेर यायला जरांगे तयार नाहीत, असेही ते म्हणाले. त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
 
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "मनोज जरांगे अहंकारातून बाहेर यायला तयार नाहीत. मराठा समाजाचं कुणीतरी नेतृत्व करत आहे, यासाठी आम्हाला त्यांचा आदर होता. समाजालाही पक्षविरहित नेता हवा असल्याने त्यांनीही समर्थन दिलं. परंतू, नंतरच्या काळात पूर्णपणे राजकीय झालेले जरांगे आम्ही पाहिले आहेत. शरद पवार त्यांना चालवत आहेत, रोहित पवारांचा सोशल मिडीया हे काही लपून राहिलेलं नाही. आता जरांगेंच्या विरोधात महाराष्ट्रात एक नकारात्मक लाट निर्माण झाली आहे. मराठा समाज हा सजग आहे त्याला नीट कळतं. भाजपला पाडून जर तुम्ही महाविकास आघाडीला निवडून आणणार असाल तर मविआ ओबीसीतून तुम्हाला आरक्षण देणार का? ते विचारा. पण तुम्ही महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाला विचारत नाही. तर सरकार, भाजप आणि देवेंद्रजींच्या पलिकडे तुम्ही जातच नाहीत. तुमच्या डोक्यात गेलेला अहंकार अत्यंत वाईट आहे," असे ते म्हणाले.