गणेश मंडळासोबत कट्टरपंथींचा पुन्हा वाद! पंतप्रधान आवास योजनांच्या इमारतींवर अरबी झेंडे
11-Sep-2024
Total Views |
वडोदरा : सूरतनंतर आता गुजरातच्या वडोदर येथे गणेश मंडळाच्या मंडपावरती दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता यावेळी गणेशोत्सवादरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरावर अरबी ध्वज फडकवण्यात आले. १० मजली असलेल्या सोसायटीत ४५० घरे आहेत. यावेळी ४८ घरांवर अरबी ध्वज फडकवल्यानंतर समाजात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. ही घटना रविवारी ९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वसना-भयली येथील ही घटना असून पंतप्रधा योजनेअंतगर्गत बांधण्यात आलेल्या अर्बन सेव्हन टॉवर्समध्ये ही घटना घडली आहे. या योजनेअंतर्गत एकून १० टॉवर उभारण्यात आले आहेत. सुमारे साडेचारशे घरांचे बांधकाम पूर्ण झाले. या घरांचे वाटप महापालिकेने केले आहे, या ४५० घरांपैकी ४८ घरे कट्टरपंथींना देण्यात आली आहेत.
या इमारतीत बहुसंख्य हिंदू असल्याने त्यांनी आपल्या घरांमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने मूर्तीची पूजा केली. तसेच एका इमारतीत राहणाऱ्या हिंदूंनी गणेश मंडळ स्थापन करत गणेशाच्या मूर्तीची पूजा केली. यामुळे येथील एका कट्टरपंथींस याचा विनाकारण त्रास झाला. त्याने आपल्या घरावर अरबी झेंडा फडकवला. हे पाहिले असता हिंदूंनी विरोध करायला सुरूवात केली. त्यावेळी काही स्थानिक कट्टरपंथी आले आणि ते ध्वज ठेवण्यावर ठाम राहिले असून त्यांनी धमक्याही द्यायला सुरूवात केली होती.
इमारतीवर अरबी झेंडा फडकवणारी कट्टरपंथी ही भाडेखोर असल्याची माहिती आहे. त्या संबंधित घरांचे मालकांनी त्यांना या ठिकाणी राहण्यास खोली देऊ नये असे तेथील स्थानिकांनी स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली आहे. आमच्या प्रत्.येक हिंदू सणांला गालबोट लावण्याचे काम हे कट्टरपंथी करतात असे स्थानिकांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले होते.
यावेळी हे प्रकरण मिटेल असे वाटले होते, मात्र यावेळी काही कट्टरपंथी एकत्र आले आणि त्यांनी इमारतींवर अरबी झेंडा लावला. त्यानंतर त्यांनी रहिवाशांना शिवीगाळही केली. त्यावेळी स्थानिक नगरसेवकांनी हे प्रकरण हातळले आणि त्याने सर्व अरबी झेंडे काढले. त्यावेळी घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली.