सिंगापूरमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना

    10-Sep-2024
Total Views |
singapore ganesh festival
 

मुंबई :   
  सिंगापूर येथे भारतीय समुदायाकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. सिंगापूरमधील मराठी समुदायाने महाराष्ट्र मंडळ ही संस्था सुरू केली असून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने महाराष्ट्र मंडळाला श्री दगडूशेठ गणरायाची मूर्ती प्रदान केली आहे.


दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा 
 

दरम्यान, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने प्रदान केलेल्या गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना महाराष्ट्र मंडळाकडून करण्यात येते. प्राणप्रतिष्ठापना करत सिंगापूर येथे मराठी समुदाय भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करत असतात. या मंडळाच्या माध्यमातून भारतीय सण सर्वजण एकत्र येत साजरा करतात, असे अध्यक्ष सचिन गांजापूरकर यांनी सांगितले.