३५ किलो साबुदाण्याचा वापर करत साकारली रांगोळी; १४ सप्टेंबरपासून पाहता येणार!
10-Sep-2024
Total Views |
मुंबई : गणेशोत्सवात विविध कलांचा आविष्कार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. गणेशोत्सवात नवनवीन संकल्पना घेऊन कलाविष्कार केला जातो. यातच आता मुलुंड येथील प्रसिध्द गणेश मूर्तीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यंदा नवा कलाविष्कार केला असून ३५ किलो साबुदाण्यापासून श्रीगणेशाची रांगोळी साकारली आहे. दि. १४ सप्टेंबर २०२४ ते २२ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुलुंडच्या आझाद भवन येथे पाहता येणार आहे.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
दरम्यान, मोहनकुमार यांनी साकारलेली ३५ किलो गणपतीची रांगोळी पाच फूट रुंद आणि सहा फूट लांब अशी आहे. दि. १४ सप्टेंबरपासून रांगोळी नागरिकांना पाहता येणार आहे. १९६१ पासून अशा प्रकारच्या रांगोळ्या दोडेचा तयार करत असून त्यांनी तयार केलेली रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात.
३५ किलो साबुदाण्याचा वापर करून केलेल्या रांगोळीची आंतरराष्ट्रीय गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. यंदा पाच फूट रुंद आणि सहा फुट लांब अशी ही रांगोळी तयार केली असून ३५ किलो साबुदाणे वापरले आहेत. या रांगोळीच्या निर्मितीसाठी मोहनकुमार यांनी रोज १२ ते १५ तास काम केले आहे.