शिर्डी : येत्या १५ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी त्यांची सभा आयोजित करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. तसेच या दौऱ्यात ते शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शन घेणार आहे.
विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय नेत्यांनी राज्यभरात दौऱ्यांना सुरुवात केली आहे. या दौऱ्यात ते जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान, साईबाबांच्या दर्शनाने उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी ते शिर्डी दौऱ्यावर जाणार असून विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे जुनी पेन्शन योजनेच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरमधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.