सुप्रिया सुळेंची तब्येत खालावली! नियोजित दौरा रद्द

    10-Sep-2024
Total Views |
 
Supriya Sule
 
पुणे : शरद पवार गटाच्या खासदार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी मंगळवारचे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. सुप्रिया सुळेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
 
 
 
सुप्रिया सुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, "माझी तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी मला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे मला माझा उद्याचा नियोजित दौरा नाईलाजास्तव पुढे ढकलावा लागत आहे. आजचा दौरा संपवून काही वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर उद्या त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील दौऱ्याची तारीख आपणांस नक्की कळविली जाईल," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  मुख्यमंत्री शिंदे बहिणींच्या घरी जाणार! 'लाडकी बहिण कुटुंब भेट अभियाना'ला सुरुवात
 
दरम्यान, युगेंद्र पवार यांनी मंगळवारपासून स्वाभिमान यात्रेला सुरुवात केली आहे. श्री क्षेत्र कण्हेरी येथे मारूतीरायाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेला सुरुवात केली. तसेच त्यांनी मारूती मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधला. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.