१२५ दुर्मिळ औषधी वनस्पतींवर आधारित खास देखावा

    10-Sep-2024
Total Views |

aayurved
 
मुंबई : लोअर परळमध्ये राहणाऱ्या संतोष वर्टेकर यांनी यावर्षी खास ‘आयुर्वेद’ या विषयावर आधारित पर्यावरणपूरक गणपतीचा देखावा त्यांच्या राहत्या घरी साकारलेला आहे. या देखाव्यात त्यांनी १२५ दुर्मिळ औषधी वनस्पती ठेवलेल्या आहे. मधमाशांच्या पोळ्या सारखी पुठ्ठयांची रचना करून त्यांनी त्यात या वनस्पती ठेवलेल्या आहेत. या वनस्पतींच्या मधोमध त्यांनी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. आणि या गणपतीला त्यांनी ‘आयुर्वेदाचार्य श्रीगणेशा’ असे नाव दिले आहे. त्यांची ही गणपतीची मूर्ती सुद्धा शाडू मातीपासून तयार केलेली आहे. आयुर्वेदाचा अभ्यास करून त्यांनी भारतातील विविध ठिकांणाहून या वनस्पती मागवून घेतल्या आणि त्या या देखाव्यात मांडल्या आहेत. सजावटीच्या कुठल्याही महागडया गोष्टिंचा वापर न करता त्यांनी हा माहितीपूर्ण आणि आकर्षक देखावा साकारला आहे.
 
“ आताच्या पिढीला या आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती होणे गरजेचे आहे म्हणून आम्ही यावर्षी हा खास देखावा साकारलेला आहे. आपण लहान होतो तेव्हा आजीच्या बटव्यातील औषधे खाऊन आपण आजारी असल्यावर आपल्याला दिली जायची आणि मग आपण बारे व्हायचो. ती औषधे खूप गुणकारी असायची पण आताच्या पिढीला ती बघायला सुद्धा मिळत नाही. त्यामुळे या आयुर्वेदिक वारशाची ओळख पुढच्या पिढीला करून देणे खूप गरजेचे आहे.” अशी माहिती संतोष वर्टेकर यांनी दिली.