म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला बळकटी देण्यासाठी....; बीएसई सीईओ रामामूर्ती यांचे मोठे विधान

    09-Aug-2024
Total Views |
mutual fund industry bse ceo ramamurthy



मुंबई :       बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई)मध्ये काही दशकांत लक्षणीय बदल घडून आले आहेत. भारतीय भांडवली बाजारातील प्रवेश आणि माहितीच्या सर्वसमावेक धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल दिसून लागले आहेत, असे बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन रामामूर्ती यांनी सांगितले.

'ASSOCHAM' 16 व्या म्युच्युअल फंड समिटला संबोधित करताना ते म्हणाले की, नियामक बदलांमुळे भांडवली बाजार क्षेत्र समांतर झाले आहे. तसेच, बाजारातील गुंतवणुकीची माहिती सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध झाली असून त्यातून व्यापक सहभागाला प्रोत्साहन मिळाले आहे. ते पुढे म्हणाले, कोविड कालावधीत मार्केटमध्ये लक्षणीय बदल झाला आहे.

बीएसई सीईओ रामामूर्तींनी सांगितले की, गुंतवणुकीचा पाया रुंदावण्याची गरज अधोरेखित करताना म्युच्युअल फंड उद्योगाला बळकटी कशी द्यावी हे देखील सुचविले आहे. त्याचबरोबर, गुंतवणूक सहभागात गेल्या चार वर्षात चार पटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता २८ लाख कोटी इतकी झाली आहे.

भारत २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनली तर ६० ते ६५ टक्के उत्पन्न गटातील लोकसंख्या आणि २० ते ३० टक्के म्युच्युअल फंडाचे योगदान असेल. बाजारातील जोखीम स्वरुपातील उत्पादने कमी करण्यासाठी अधिक ब्रॉड-बेस्ड इंडेक्स फंड वाढवायला हवे, असेही सीईओ रामामूर्ती यांनी सांगितले.