नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अटींसह जामीन मंजुर केला आहे.सर्वोच्च न्यायालयाने आप नेते मनीष सिसोदिया यांना दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही.विश्वनाथन यांच्या खंडपीठाने याप्रकरणी निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर करताना सिसोदिया यांना अटींचा पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सिसोदिया तुरुंगाबाहेर असताना या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत. ते कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाहीत, देश सोडून जाऊ शकत नाहीत आणि त्यांना त्यांचे पारपत्रही जमा करावे लागणार आहे. त्याचवेळी सिसोदिया यांना दर सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.