शरद पवारांना धक्का! सोनिया दुहान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    07-Aug-2024
Total Views |
 
Sonia Doohan
 
नवी दिल्ली : शरद पवार यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सोनिया दुहान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवार, ६ ऑगस्ट रोजी दीपेंद्र सिंह हुडा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला.
 
काही महिन्यांपूर्वी सोनिया दुहान या शरद पवार गट सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर त्यांनी सुप्रियाताईंच्या आसपासच्या काही लोकांकडून पक्षातील लोकांना संपवण्याचे काम केले जात असून लवकरच मी पक्ष सोडणार आहे, अशी घोषणा केली होती.
 
 
 
त्यानंतर आता त्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भूपिंदर शुडा हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयभान चौधरी आणि खासदार दीपेंद्र सिंह हुडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.