"बांग्लादेशात हिंदूंना त्रास होत असेल तर..."; मनसेचा थेट इशारा

    07-Aug-2024
Total Views |
 
Sandip Deshpande
 
मुंबई : बांग्लादेशात हिंदूंना त्रास दिला जात असेल तर इथे असलेल्या अनधिकृत बांग्लादेशींना पर पाठवलं जाईल, असा थेट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. बांग्लादेशामध्ये उसळलेल्या हिंसाचारात इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून हिंदूंना टार्गेट केले जात असून त्यांच्या घरांवर हल्ले करण्यात येत आहे. यावर आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
 
संदीप देशपांडे म्हणाले की, "बांग्लादेशात हिंदूंना जर जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर इथेही असंख्य अनधिकृत बांग्लादेशी घुसलेले आहेत. त्या अनधिकृत बांग्लादेशींना शोधून त्यांना चोपून चोपून इथून हुसकवून लावलं जाईल. त्यांना बांग्लादेशला परत पाठवावं लागेल. देशात किंवा देशाबाहेर कुठेच हिंदूंवर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही," असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
हे वाचलंत का? -  आम्ही आरक्षण दिलं पण जरांगेंना समाधान नाही, त्यांच्या अपेक्षा जास्त!
 
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि त्या भारतात आल्या आहेत. मात्र तरीही बांगलादेशात अस्थिरता, हिंसक परिस्थिती आहे. बांगलादेशच्या राजकीय उलथापालथीनंतर लवकरच बांगलादेशातील युनूस खान यांच्या खांद्यावर अंतरिम सरकारची जबाबदारी देण्यात येणार आहे.