राज ठाकरे मनोज जरांगेंची भेट घेणार? मराठा आंदोलकांशी काय चर्चा झाली?

    06-Aug-2024
Total Views | 49
 
Raj Thackeray & Jarange
 
धाराशीव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, यावेळी ते आरक्षणासंबंधी जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
सोमवारी राज ठाकरेंनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना आरक्षणाबद्दलचा प्रश्न विचारला असता महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, इथे आरक्षणाची गरजच नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रात्री राज ठाकरे मुक्कामी असलेल्या धाराशीवमधील एका हॉटेलमध्ये मराठा आंदोलक गेले. राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
यावेळी राज ठाकरेंनी या आंदोलकांशी चर्चा केली. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, ही माझी भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाबाबत मी मनोज जरांगेंशी चर्चा करणार आहे, असेही ते म्हणाले. या दौऱ्यावेळी आपण मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचेही त्यांनी या आंदोलकांना सांगितले. त्यामुळे आता राज ठाकरे मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121