मनसेच्या उमेदवारांवर विधानसभेला बहिष्कार टाका : रामदास आठवले

    06-Aug-2024
Total Views |

Ramdas athvle
 
मुंबई : राज्यात आरक्षणाची गरज नाही असे अत्यंत चुकीचे बे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या विरोधातील केलेले विधान मागे घ्यावे त्यांनी जर अशीच आरक्षण विरोधी भूमिका कायम ठेवले तर आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांवर दलित बहु आदिवासी ओबीसी बहुजन सर्व मतदारांनी बहिष्कार घालावा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले.
 
जोपर्यंत या देशात जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दलित आदिवासींना आरक्षण दिलेले आहे. दलित आदिवासींचे आरक्षण हे जातीवर आधारित आहे कायद्याने जरी जातिव्यवस्था संपली असली तरीही या देशात खेड्यापाड्यात दलित आदिवासींवर आजही जातीवरून अत्याचार होतात त्यामुळे संविधानाने दिलेल्या आरक्षणावर दलित आदिवासींचा हक्क आहे राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत.
 
त्यांना महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे असेल तर त्यांनी आरक्षणाला विरोध करू नये आरक्षणाला विरोध करणे चुकीचे आहे राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या विरोधात केलेले वक्तव्य मागे घ्यावे आरक्षण विरोधी भूमिका राज ठाकरे यांनी यापुढेही कायम ठेवली तर आगामी विधानसभा निवडणूक दलित आदिवासी बहुजन ओबीसी सर्व मतदार राज ठाकरे यांच्या मनसे उमेदवारांवर बहिष्कार टाकतील. राज ठाकरे यांनी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यामुळे संपूर्ण दलित आदिवासी ओबीसी बहुजन समाजात राज ठाकरे यांच्या बद्दल तीव्र नाराजगी आहे.
 
राज्यात 10% आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागासांनाही मिळत आहे आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षणाचा मराठा आणि ब्राह्मण समाजातील ही गरिबांना त्याचा लाभ मिळत आहे. आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीय जनतेत ही राज ठाकरेंनी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याबद्दल तीव्र नाराजी आहे.असे ना.रामदास आठवले म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे की सर्वप्रथम मागणी मी केलेली आहे. दलित आदिवासी ओबीसी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे.
 
समाजातील गरिबांना आरक्षण मिळवून दिलेच पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. समाजाला आरक्षण देण्यासाठी म्हणून जरांगे यांनी चांगले आंदोलन उभारले आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे मात्र मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याचा मनोज जरांगे यांचा हट्ट हा मराठा समाजाचे नुकसान करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा किडा सोडवण्यासाठी तामिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गाचे दोन स्वतंत्र प्रवर्ग केले पाहिजे यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या ओबीसीच्या प्रवर्गाला धक्का न लावता दुसरा ओबीसीचा प्रवर्ग तयार करून त्याद्वारे मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देण्यात यावे अशी आपली सूचना आहे. नामदार रामदास आठवले म्हणाले.
 
केंद्र सरकारकडे मराठा समाजाला आरक्षणाचा प्रस्ताव आला तर केंद्र सरकारला मराठा समाजासोबत गुजरात मधील पाटीदार पटेल दक्षिणेतील रेड्डी समाज तसेच जाट समाज राजपूत समाज असे देशभरातील सर्व क्षत्रिय समाजाचा विचार करावा लागेल आणि देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल तसा प्रस्तावाला तर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे क्षेत्रीय समाजातील गरिबांना आरक्षण मिळवून देण्याचा आपण जरूर निर्णय घेऊ मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे नामदार रामदास आठवले म्हणाले.