माझ्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना....प्रसिध्द हॉकीपटूने दिले संकेत!

    04-Aug-2024
Total Views |
indian-hockey-team-beat-great-britain-to-enter-semi-final-olympics


नवी दिल्ली :       पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून नवा इतिहास घडविण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे. त्यातच आता भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेशमुळे हे शक्य झाले असून याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहे. दरम्यान, ग्रेट ब्रिटनविरुध्दच्या सामन्यात भारतीय संघाने पेनल्टी शूटआऊटद्वारे उपांत्य फेरी गाठली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चित्रांमध्ये त्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करताना त्याला अनेक हात दाखवले जात आहेत. भारताच्या विजयानंतर देशातील क्रीडाप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दोन्ही संघ आक्रमक वृत्तीने खेळत असल्याने ही उपांत्यपूर्व फेरीचा सामना खूपच मनोरंजक होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगने २२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करत भारताचे खाते उघडले आहे.

या सामन्यात हरमनप्रीतचा ऑलिम्पिकमधील हा ७वा गोल ठरला असून या गोलच्या काही वेळापूर्वी अमित रोहिदासला लाल कार्ड दाखवण्यात आले होते. भारत केवळ १० खेळाडूंसह खेळत होता. ग्रेट ब्रिटननेही २७व्या मिनिटाला ली मॉर्टनच्या गोलमुळे बरोबरी साधली. "मी स्वतःला सांगितले की हा माझा शेवटचा सामना असू शकतो किंवा जर मी गोल वाचवला तर मला आणखी दोन गेम खेळायला मिळतील, अशी भावना गोलकीपर पी आर श्रीजेश याने व्यक्त केली आहे.