आता दीक्षांत समारंभ ब्रिटीशकालीन 'काळ्या पोशाखात' होणार नाहीत!

केंद्र सरकारने एम्स आणि इतर संस्थांना दिले निर्देश

    24-Aug-2024
Total Views | 83

Convocation Ceremony

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Convocation Ceremony)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व केंद्रीय रुग्णालयांना दीक्षांत समारंभात ब्रिटीश वसाहतवादी चिन्हाऐवजी भारतीय पोशाख अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या या निर्णयात देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये, विशेषत: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना काळा गाऊन आणि काळी टोपी घालण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, काळा गाऊन आणि टोपी घालणे हे भारतीय संस्कृतीला अनुसरून नाही. दीक्षांत समारंभात परिधान केला जाणारा पोशाख हा त्या राज्यातील पोशाख आणि परंपरांवर आधारित असावा. आता हा वसाहतवादी वारसा बदलण्याची गरज असल्याचे निर्देशात म्हटले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, सध्या मंत्रालयाच्या विविध संस्थांकडून दीक्षांत समारंभात काळा गाऊन आणि टोप्या वापरल्या जात आहेत. या ड्रेसचा ट्रेंड युरोपमध्ये मध्ययुगात सुरू झाला. पुढे तो ब्रिटिशांच्या माध्यमातून वसाहतीत देशांत पसरला.



सरकारच्या निर्णयामुळे भारतातील शैक्षणिक संस्था आता आपली संस्कृती आणि परंपरा दाखवू शकणार आहेत. आरोग्य मंत्रालयाने सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना त्यांच्या संस्थांच्या दीक्षांत समारंभासाठी योग्य भारतीय ड्रेस कोड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा ड्रेस कोड राज्यातील स्थानिक परंपरांवर आधारित असावा, असे म्हटले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही वेगाने करण्‍यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्‍याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्‍यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्‍या स्‍वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे. पवई तलावाच्‍या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121