महाराष्ट्रातील पर्यटकांना नेपाळला घेऊन जाणारी बस नदीत कोसळली! १४ जणांचा मृत्यू

    23-Aug-2024
Total Views |
 
Nepal bus accident
 
काठमांडू : महाराष्ट्रातील प्रवाशांना नेपाळमध्ये घेऊन जाणारी उत्तर प्रदेशातील बस नदीत कोसळली असून यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील तानाहुन इथे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. या बसमध्ये एकूण ४० लोकं असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हल्सची असून या बसमध्ये ४० लोकं पर्यटनाकरिता नेपाळमध्ये गेले होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
 
हे वाचलंत का? -  आदित्य ठाकरेंवर NCPCR च्या तीन केसेस! लहान मुलांना छळल्याचा आरोप
 
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि नेपाळ लष्कर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात येत आहे.