उद्या महाराष्ट्र बंद! शाळा, कॉलेज, बस, मेट्रो सुरू राहणार की, बंद? जाणून घ्या सविस्तर...
23-Aug-2024
Total Views |
मुंबई : बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याच्याराच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. दरम्यान, यावेळी शाळा, कॉलेज, बस, मेट्रो सुरु राहणार की, बंद याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत 'महाराष्ट्र बंद' बद्दलची माहिती दिली. ते म्हणाले की, "उद्याचा महाराष्ट्र बंद हा राजकीय बंद नसून विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. हा बंद केवळ महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नाही, तर नागरिकांच्या वतीने आम्ही करतो आहोत." तसेच यावेळी त्यांनी नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
"उद्याचा बंद हा कडकडीत बंद असायला हवा. मात्र, यावेळी रुग्णवाहिका, वृत्तपत्र, अग्निशमन यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरु राहायला हव्या. दुपारी २ वाजेपर्यंत उद्याचा बंद पाळण्यात यावा. उद्या लोकल आणि बससेवा बंद असायला हवी," असेही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात उद्या शाळा, कॉलेज, बस, लोकलसेवा बंद असणार का?
महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारला असला तरी राज्य सरकारने याला अद्याप पाठींबा दिलेला नाही. तसेच सरकारने शाळा, कॉलेज, बस, लोकलसेवा बंद ठेवण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे उद्या शाळा, कॉलेज, बस, लोकलसेवा नेहमीप्रमाणे सुरु राहण्याची शक्यता आहे.