धक्कादायक! अकोल्यात १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

    23-Aug-2024
Total Views | 88
 
Child Rape
 
अकोला : राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता अकोल्यातही एका १० वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे.
 
अकोल्यात १० वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाकडूनच अत्याचार करण्यात आला आहे. तेल्हारा तालुक्यातील एक कुटुंब कामानिमित्त वल्लभनगर येथे नातेवाईकांकडे आले आणि मुलीला त्यांच्याकडे ठेवून ते कामानिमित्त बाहेर गेलेत. दरम्यान, आरोपीने संधी साधत त्या १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. त्या मुलीने आपल्या आईवडीलांना सगळा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघड झाली.
 
दरम्यान, यश गवई असे २४ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच अकोट फाईल पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अकोल्यात सहा शाळकरी मुलींचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही घटना घडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121