सागरी उपकरणे आणि यंत्रणांच्या स्वदेशीकरणाला चालना; नौदल-बीईएमएल यांच्यात सामंजस्य करार
21-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि बीईएमएल इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून सागरी उपकरणे आणि यंत्रणा यांच्या स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सागरी अभियांत्रिकी उपकरणांचे स्वदेशीकरण करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नौदल आणि बीईएमएल यांच्यात झालेल्या सामंजस्य करारात महत्त्वाची पावले उचलत बीईएमएल कंपनीने संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘वर्ग अ’ श्रेणीतील आणि देशाच्या आघाडीच्या संरक्षण आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादन कंपनीने दि. २० ऑगस्ट रोजी नौदलाशी सामंजस्य करार केला आहे.
नवी दिल्ली येथील नौदलाच्या मुख्यालयात नौदलाचे एसीओएम (डी आणि आर) रियर अॅडमिरल के श्रीनिवास आणि बीईएमएलचे संरक्षण विभाग संचालक अजित कुमार श्रीवास्तव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उपक्रम म्हणजे महत्त्वपूर्ण सागरी अभियांत्रिकी उपकरणे तसेच यंत्रणा यांची स्वदेशी रचना, विकास, निर्मिती, चाचणी आणि उत्पादनविषयक पाठबळासाठी द्विपक्षीय सहकार्यात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.