रिक्षाचालक फारूकने केला तरुणीचा विनयभंग! मुलीने घेतली भरधाव रिक्षातून उडी

    21-Aug-2024
Total Views | 26

Assam Rape
 
दिसपुर : लैंगिक अत्याचाराचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. पं. बंगालच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये लहानग्या मुलींवर अत्याचार कऱण्यात आला होता, त्यानंतर अकोल्यातही हाच प्रकार घडला आहे. त्यानंतर आता देशातील आसाम येथे अशीच घटना घडली आहे. शाळेतील विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे निघाली असताना एका रिक्षा चालकाने तिच्यासमोर अश्लील चाळे केले असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना १९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
 
विद्यार्थीनी आसाम विद्यापीठात शिक्षण घेत होती, त्यानंतर ती आपल्या तासाला हजेरी लावून इरोंगमाराकडे निघाली, त्याठिकाणी पीडितेचे घर होते. यावेळी एका शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या सांगण्यावरून पीडित विद्यार्थीनीला आपल्या शेजारी बसण्यासाठी रिक्षा चालक बद्रुजमान फारूकने सांगितले होते. शेजारी बसलेल्या प्रवाशाला कसलाही त्रास नको म्हणून तिने आज्ञा पाळत रिक्षा चालकाच्या शेजारी बसली.
 
यावेळी रिक्षा चालकाने केलेले कृत्य हे माणुसकीला काळीमा लावणारे कृत्य होते. रिक्षाचालकाने आपल्या पॅन्टची चैन खोलत आपले गुप्तांग दाखवले. यावेळी विद्यार्थीनीने प्रतिकार करत चालत्या रिक्षातून उडी घेत घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने आपली सर्व ताकद पणाला लावली आणि तिने संबंधित नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच तिने आसाम विद्यापीठातही घडलेल्या प्रकरणावर विद्यापीठ प्रशासनाला सूचित केले.
 
या घटनेमुळे विद्यार्थी वर्गात संताप निर्माण झाला आहे. याप्रकरणात विद्यार्थ्यांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली होती. आरोपी २० ऑगस्ट रोजी, बकीरनगर, कचार येथे पोलिसांच्या ताब्यात सापडला. याप्रकरणात त्याची कसून चौकशी सुरू आहे.
 
घटनेच्या परिणामी आसाम विद्यापीठाच्या आवारात तणाव वाढला आहे. विद्यार्थ्यांनी झालेल्या घटनेमुळे प्रत्येकाच्या सुरक्षेची हामी देण्याची मागणी केली आहे. यावर सरकारने भविष्यात भर द्यावा, अशी सरकारने मागणी केली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121