नवी दिल्ली : अजमेर लैंगिक शोषण प्रकरणातील सहा दोषींना अखेर ३२ वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अजमेरमधील विशेष पॉक्सो न्यायालयाने १९९२ सालच्या अजमेर लैंगिक शोषण प्रकरणातील सहा दोषींना शिक्षा सुनावली आहे. विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रंजन सिंह यांनी सहा जणांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे दोषींना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी आणि सय्यद जमीर हुसेन यांना दोषी ठरवण्यात आले आहे. राजस्थानमधील अजमेर येथील विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
या प्रकरणी २३ जून २००१ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण १९९२ सालचे आहे. काळात अजमेर शहरातील तब्बल १०० हून अधिक मुलींवर मुलींवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या होत्याच. केवळ बलात्कारच नव्हे तर त्यांची नग्न छायाचित्रेदेखील मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील अनेक पिडितांनी आत्महत्याही केल्या होत्या. या प्रकरणात अजमेर शरिफ दर्ग्याचे सेवक आणि काँग्रेस नेत्यांचा सहभाग उघड झाला होता.