उत्तराखंडमध्ये ढगफुटी, १६ जणांचा मृत्यू

    02-Aug-2024
Total Views |

Uttarakhand Cloud Burst
(Image Credit : PTI)
उत्तराखंड (Uttarakhand Cloud Burst) : राज्यासह देशभरात पावसाने थैमान घातलं आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटी (Uttarakhand Cloud Burst) झाली आहे. या ढगफुटीमुळे उत्तराखंडमध्ये १२ तर हिमाचल प्रदेशमध्ये ४ म्हणजेच एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे उत्तर प्रदेशचे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
याठिकाणी ५० नागरिक बेपत्ता झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शेकडो पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हिमाचल प्रदेश येथील मंडीतील पधर आणि शिमला जिल्ह्यात ढगफुटी (Uttarakhand Cloud Burst) झाली. तसेच मनाली आणि चंदीगड येथील वाहतुक सेवा आता ठप्प झाली आहे. चंदीगडच्या राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क खंडीत करण्यात आला आहे.
या अतिवृष्टीमुळे पिकांचेही नुकसान झाले. सफरचंदाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे सफरचंदाचं पिक घेतलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. अशी माहिती हिमाचलप्रदेशचे महसूलमंत्री जगतसिंह नेगी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
तसेच बुधवारपासून उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. यावेळी एकाच कुटुंबातीय तीन जणांसह १२ जाणांचा मृत्यू झाला. आणि सहा जण जखमी आहेत. पूरग्रस्त भागात एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पडझड झाल्याने प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत दखल घेत आहे.
बुधवारी उत्तराखंड येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे यात्रेकरूंना रोखण्यात आलं. गौरीकुंड महामार्गावर दरड कोसळल्याने दर्शन घेण्यासाठी आलेल्या अनेक यात्रेकरूंना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात आलं.