डिजिटल डेटा संरक्षण कायद्याबाबत केंद्र सरकारच्या हालचाली सुरू, लवकरच मसुदा येणार
19-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : केंद्र सरकार एका महिन्याच्या आत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याअंतर्गत मसुदा नियम जारी करू शकते, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. सरकारने याआधी कायद्याच्या डिजिटल अंमलबजावणीवर काम केले आहे आणि त्यानुसार नियम बनवले आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सरकार एका महिन्याच्या आत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याअंतर्गत मसुदा नियम जारी करू शकते. केंद्र सरकारने याआधी कायद्याच्या डिजिटल अंमलबजावणीवर काम केले असून त्यानुसार नियम बनवले आहेत. तसेच, फ्रेमवर्क तयार आहे आणि मसुदा नियम एका महिन्यात सल्लामसलत करण्यासाठी मांडला जाईल, असेही केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, नियमांच्या अंतिम मसुद्याचे गेल्या आठवड्यात पुनरावलोकन करण्यात आले होते. सुधारित अंतिम मसुदा एका महिन्यात लोकांसमोर येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सरकार एका महिन्यात डेटा संरक्षण नियमांचा मसुदा जारी करू शकते अशी शक्यता केंद्रीय मंत्र्यांनी वर्तविली आहे.