‘कल्की’मध्ये प्रभास जोकर... तर मुंज्या चित्रपटाबदद्ल खूप”, अर्शद वारसीचं स्पष्ट मत

    19-Aug-2024
Total Views |
 
arshad
 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीवर हळूहळू दाक्षिणात्य चित्रपटांचा पगडा वाढताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांना भरघोस प्रतिसाद मिळवला होता. यात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन झळकले होते. दरम्यान, याच चित्रपटावर अभिनेता अर्शद वारसी याने आपले मत मांडले असून ‘कल्की’मध्ये प्रभास जोकर वाटत होता असे त्याने थेट म्हटले आहे.
 
‘कल्की 2898 एडी’ पाहून निराश झाल्याचं स्पष्ट मत अर्शदने मांडलं. अर्शद म्हणाला की, “मी कल्की पाहिला, मला चित्रपट अजिबात आवडला नाही. अमिताभ बच्चन यांनी अप्रतिम काम केलं आहे. मी शपथ घेऊन सांगतो की त्यांच्याकडे असलेली शक्ती थोडी आपल्याला मिळाली तर आपलं आयुष्य सेट होईल. त्यांचं काम अप्रतिम आहेत,” असं अर्शद समदिश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. पुढे तो प्रभासच्या भूमिकेबद्दल म्हणाला की, “प्रभासला पाहून मला खरोखर खूप वाईट वाटलं. तो काय होता? तो एखाद्या जोकरसारखा वाटत होता. का? मला मॅड मॅक्स बघायचा आहे. मला मेल गिब्सनला तिथं बघायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं, का करता असं? मला खरंच कळत नाही”. अर्शदची ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे.
 
याशिवाय राजकूमार राव याची प्रमूख भूमिका असणाऱ्या ‘श्रीकांत’ चित्रपटाचे आणि राजकुमार रावच्या अभिनयाचे अर्शदने कौतुक केले. “मी श्रीकांत पाहिला आणि मला तो खूप आवडला. मला वाटतं राजकुमारने चित्रपटात खूप छान काम केलं आहे,” असं तो म्हणाला.
 
तर आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आमि शर्वरी वाघ व अभय वर्मा अभिनित विनोदी भयपट ‘मुंज्या’चे अर्शदने विशेष कौतुक केले. यावेळी तो म्हणाला की, “मी ‘मुंज्या’बद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. एक नवीन मुलगा व शर्वरी असलेला हा एक छोटासा विनोदी भयपट आहे. मला ‘किल’ देखील पाहायचा आहे. इंडस्ट्रीने आशयावर वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. कारण दाक्षिणात्य इंडस्ट्रीही त्यांचे चित्रपट व आशयावर प्रयोग करत आहे”.