दुर्घटना की घातपात! साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे घसरले, आयबी करणार तपास

    17-Aug-2024
Total Views |

Railway Accident
 
लखनऊ : कानपुर येथे साबरमती एक्सप्रेसचे (Sabarmati Express Accident) २२ डबे रेल्वे रूळावरून घसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १६-१७ ऑगस्ट रोजी पहाटे २.३५ वाजता कानपूर येथील गोविंदपूर येथे घडली होती. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. याप्रकरणाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रूळाचे डबे रूळावरील जाड लोखंडी वस्तूला आदळल्याने रेल्वेचे डबे घसरले आहेत. याप्रकरणात आयबी संस्थेचा तपास सुरू आहे.
 
साबरतमी एक्सप्रेस रेल्वे ही वाराणसीहून अहमदाबादकडे निघाली होती. त्यावेळी हा अपघात झाला. रेल्वेरूळावरून रेल्वेटे डबे घसरल्याने प्रवासी भयभीत झाले होते. ही घटना समजताच घटनास्थळी रेल्वे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन विभागाचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले.
 
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणाची माहिती सोशल मीडियावर शेअर करत ट्वि़ट केली आहे. त्या म्हणाल्या की, साबरमती एक्सप्रेस ही अहमदाबादकडे रवाना होत असताना हा अपघात घडला. साबरमती एक्सप्रेस पहाटे २.३५ वाजता रेल्वे रूळावरून घसरली होती. अशी पोस्ट करत सोशल मीडियावर ट्विट केले आहे.
 
 
 
तसेच त्यांनी सांगितले की, इंजिनला जोरदार धडक दिल्याच्या इंजिनवर खुणा आहेत. याप्रकरणातील पुरावे आहेत. याप्रकरणात आयबी आणि उत्तर प्रदेश पोलीस कार्यरत आहेत. प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्रवाशांना अहमदाबादला जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
याप्रकरणात आता रेल्वे चालकाने सांगितले की, इंजिनला लोखंडी वस्तू आदळल्याने हा अपघात झाला आहे. तसेच याअपघातामुळे रेल्वेचा गार्ड वाकल्याचे चालकाने सांगितले आहे. डीआरएम, एडीआरएम, कमर्शियल हेड, टेक्निकल हेड, मेडिकल टीम पोहोचली आहे. रेल्वेरूळाच्या दुरूस्तीचे सध्या काम सुरू असल्या़ची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.