ममतांचा उलटा न्याय! कार्यकर्त्याने बलात्काऱ्यांविरोधात आवाज उठवला म्हणून केली हकालपट्टी

    16-Aug-2024
Total Views |


Mamta Banerjee
 
कोलकाता (Shantanu Sen) : डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने शंतनू सेन यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. बलात्कार आणि हत्येची घटना घडली ते आर.जी. कर रुग्णालय हे असामाजिक तत्वांचा अड्डा बनला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळेच त्यांच्यावर ही पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
 
या महाविद्यालयात ठिकाणी महिला डॉक्टरची हात्या करण्यात आली होती. शंतनू सेन हे पीडितेला न्याय मिळावा म्हणून डॉक्टरांच्या पाठिशी उभे आहेत. मात्र आंदोलक डॉक्टरांची पाठराखण करणे शंतनू सेन यांना महागात पडले. दरम्यान शंतनू सेन यांची मुलगी ही आर जी कर रूग्णालयात शिक्षण घेत आहे. तर शंतनू सेन आणि त्यांच्या पत्नीने याआधी आर जी कर महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. दरम्यान पीडित डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे रूग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन केले.
 
शंतनू सेन यांचे डॉक्टरांच्या आंदोलनाला समर्थन होते. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले. शंतनू सेन यांनी घडलेल्या घटनेवर भाष्य केल्याने तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मिळालेल्या माहितीनुसार शंतनू सेन हे आर जी कर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आज त्याच विद्यालयात घडलेल्या घटनेविरोधात आवाज उठवला. त्यांनी सांगितले की, "माझी मुलगी याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सहा महिन्यात तिचे शिक्षण पूर्ण होईल", या घडलेल्या घटनेमुळे शंतनू सेन यांच्या पत्नी काकली म्हणाल्या की, "माझ्या मुलीने अशा ठिकाणी रात्रपाळी केलेली मला आवडणार नाही", असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
 
 
 
ते म्हणाले की, "महाविद्यालयात एक रॅकेट सुरू आहे आणि जर तुम्ही त्यात फसला तर आपल्याला मानसिकदृष्ट्या टार्गेट केले जाईल. मला कोणत्याही प्राध्यापकाचे नाव घ्यायचे नाही. जर आपण एखाद्च्या मनात कितीही चांगले राहा, मात्र तुम्हाला तुमची पदवी दिली जाणार नाही. तुमची पदवी रद्द केली जाईल." त्यानंतर शंतनू सेन पुढे म्हणाले की, "सरस्वती पूजेच्या एकदिवसाआधी माझी मुलगी एरा कार्यक्रमासाठी महाविद्यालयात जात होती. माझी मुलगी याप्रकरणात अडकू नये यासाठी तिला महाविद्यालयातच येऊ दिले गेले नाही. कोणीही तिच्यासोबत बोलत नाही तसेच तिच्यासोबत कोणीही अभ्यास करत नाहीत," असा दावा शंतनू सेन यांनी केला आहे.
 
शंतनू सेन यांनी आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर उघड टीका केली आहे. संदीप घोष हे सत्ताधारी पक्षाचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या तीन वर्षांपासून आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयाची बिकट अवस्था आहे. तसेच टीएमसी बंगालचे उपाध्यक्ष जयप्रकाश मजुमदार यांनी रुग्णालय प्रशासनावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांना काढून टाकण्याचे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी शंतनू सेन यांच्या प्रवक्तेपदावरून हटवण्याचा निर्णय याप्रकरणाआधीच घेतल्याचा दावा करण्यात आला.