स्वातंत्र्यदिनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा टी-शर्ट घातला म्हणून काँग्रेस नेत्याचा तीळपापड
16-Aug-2024
Total Views |
गांधीनगर : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Swantarta Veer Sawarkar )चित्र असलेले टी-शर्ट काँग्रेस नेत्याने हिसकावल्याचा प्रकार गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात उघडकीस आले आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील सांगणी गावात घडली. याप्रकरणी काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय मुख्य संघटक लालजी देसाई आणि गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष रुत्विक मकवाना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आहे.
राजकोट जिल्ह्यातील चोटिला पोलीस ठाणे येथे काँग्रेस नेते लालजी देसाई आणि रुत्विक मकवाना यांच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगणी गावातील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित शाळेचे मुख्यध्यापक कल्पेश चौहान यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे.
१४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्राथमिक विद्यार्थ्यांची रॅली निघाली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी परिधान केलेले वीर सावरकरांचे टी-शर्ट काढण्यास सांगितले. रॅली थांबवून संबंधित शिक्षकांना काँग्रेस नेता लालजी देसाईने “महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सावरकरांचे टी-शर्ट विद्यार्थ्यांना घालण्यास सांगताना तुम्हाला लाज वाटत नाही का?" असा सवाल केला आहे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा टी-शर्ट परिधान करायला सांगून स्वातंत्र्यांचा अपमान करू नका", असे विधान काँग्रेस नेता लालजी देसाईने केले आहे.
यावेळी लालजी देसाईने विद्यार्थ्यांनी परिधान केलेले वीर सावरकरांच्या टी शर्टचे व्हिडिओ शूट केले. ते व्हि़डिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असे एफआरआयमध्ये दाखल कऱण्यात आले आहे. तसेच मुख्यध्यापक आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांनी परिधान केलेले वीर सावरकरांचे टी-शर्ट काढण्यास सांगितले. मात्र यावर मुख्यध्य़ापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी परिधान केलेले टी-शर्ट हे मुंबईच्या इंदुमती वसंतलाल चॅरिटेबल ट्रस्टने भेट दिले असल्याचे सांगितले.